रोहन दादा बाठे यांचे काम युवा पिढीला प्रेरणा देणारे :-सारंग शेटे .

Maharashtra varta
रोहन दादा बाठे यांचे काम युवा पिढीला प्रेरणा देणारे :-सारंग शेटे .

कापूरहोळ( वार्ताहर):-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी असल्यावर शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचवल्या जातात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भोर पंचायत समितीचे सदस्य रोहन बाठे हे आहेत .रोहन दादा बाठे  यांचे सामाजिक, राजकीय काम युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे. असे प्रतिपादन 'भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंगदादा शेटे 'यांनी केले.

 कापूरहोळ ता. भोर येथे "अमृता सभागृहात "भोर पंचायत समितीचे सदस्य रोहन बाठे यांच्या वाढदिवसानिमित्त 'कामधेनु सहकारी पतसंस्था' व 'रोहन दादा बाठे  मित्रपरिवार' यांच्या वतीने भोर तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या भोर तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकारांना "कोव्हीड योद्धा" पुरस्काराने ने सन्मानित करण्यात आले. त्या कार्यक्रमाप्रसंगी शेटे बोलत होते.

सध्याच्या काळामध्ये समाज जागृती  ठेवण्याचे पत्रकारांचे योगदान मोठे आहे .शासन व समाज व  जनसामान्यांपर्यंत माहितीची योग्य देवाण-घेवाण घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत डोंगर- दऱ्यातील गाव -वाडी वस्ती ते महामार्गावरील छोट्या-मोठ्या कंपन्यातील कामगारांच्या व्यथा शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय देण्याचे काम भोर तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी मेहनतीने व चिकाटीने केल्याबद्दल भोर  तालुक्यातील अग्रगण्य असलेली कामधेनु सहकारी पतसंस्थेच्या वतीने भोर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा संस्थेच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून  सत्कार करण्यात आला. 

पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवक आणि  शिक्षक यांच्या प्रमाणे "पत्रकार" हा देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून वार्तांकन करतात. याची दखल घेत रोहन बाठे  मित्रपरिवाराने घेतली .त्यामुळे पत्रकारांना  यापुढे काम करण्यास निश्चितपणे प्रेरणा व ऊर्जा मिळेल असे संस्थेचे संस्थापक संचालक विलास बापू बोरगे यांनी म्हटले. या कार्यक्रमास  तुळशीराम वीर, मनीषा बाठे, विकास गाडे, दिलीप बाठे, भगवानराव भांडे, नितीन बापू दामगुडे,विजय गोळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बाठे यांनी मानले.
To Top