उद्योग,समाज सेवा क्षेत्रातील "माणिक चंदन" पर्व हरपलं.
ज्येष्ठ उद्योगपती माणिकचंद दुगड यांचे निधन.
पुणे (विशेष प्रतिनिधी):----
"चंदन जळते शीतल मंद,
"प्रेरित असा, कीर्तीचा सुगंध.
झिजते वात तव ज्योतीची ,
उजळण्या सर्व दिशा दाही .
"प्रीत, प्रेम, भक्ती" हीच जीवनशक्ती
असा असावा देह चंदनापरी"..
चंदनाच्या कीर्तीच्या सुगंधा प्रमाणे आपले जीवन सदैव दरवळत ठेवून आपल्या कुटुंबाला त्याचबरोबर समाजातील दीन दुःखी, गोरगरिबांची सेवा करणारे पुण्यनगरीतील दानशूर व्यक्तिमत्व,उद्योगपती, आदर्श समाजसेवक माणिकचंद दुगड यांचे बुधवार दि. 17 जून 2020 रोजी निधन झाले.
या धरणीवर कितीतरी जीव जगतात.
जन्मतात आणि वृद्ध होऊन सर्वांचा निरोप घेतात. लक्षात तेच राहतात ज्यांनी आपले जगणे समाजासाठी, दीन -दुःखीतांसाठी सार्थकी लावले व इतरांसाठी काहीतरी भरीव कार्य केले. माणसे जोडणे आणि ती आपलीशी करून ठेवणे ही एक अंगभूत कला आहे. ती सर्वांना साध्य होते असे नाही. माणसं जोडणारा असा एक अवलिया देव माणूस "माणिकचंद शेठ भाऊ दुगड "आपल्यातून देवाघरी गेले. त्यांनी चंदनाप्रमाणे आपला देह झिजवला. उदंड कीर्ती करून ठेवली .कात्रज परिसरात अनेक मंदिरे दुगड यांनी उभारली आहेत, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात, त्यांचे विशेष सामाजिक काम व योगदान होते.१९८० साला पासून विविध भागात त्यांनी गोशाळा स्वतः उभारल्या. स्वखर्चाने त्यांची देखभालसेवा सुश्रूषा करत होते. अनेक धार्मिक मंदिरांची प्रतिष्ठापना केली. तसेच अनेक धार्मिक संस्थेचे पदाधिकारी म्हणूंनही त्यांनी उत्कृष्ट ,निरपेक्ष ,स्वतःचे विशेष योगदान देऊन प्रेरणादायी काम पाहिले.
आधुनिक युगात, प्रचंड विस्तारित शहरीकरणातही एकत्र कुंटुब पध्दती ही जीवन मूल्यांचा संस्कार जोपासत ती टिकवून ठेवली. कठोर परिश्रमच्या बळावर ,व प्रामाणिक तेच्या जोरावर उद्योग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले.
यशस्वी व प्रेरणादायी उद्योजक म्हणून यश मिळविले, गरिब,प्रतिकूल परिस्थितीमध्ये शून्यातून त्यांनी विश्व निर्माण करत लोकप्रिय व प्रतिभावंत झालेला" दुगड ग्रुप "या नावाने सुरू करून व्यवसायात प्रचंड यश मिळविले. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना,विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य मदत करणारे दुगड शेठ उर्फ भाऊ अशी त्यांची ओळख होती.
अनेक युवकांना त्यांनी रोजगार दिले. तसेच स्वतःचे घर घेणे लग्नं समारंभात मदत करत होते. जैन धर्मगुरु यांच्यासाठी त्यांनी विशेष वृद्धाश्रम बांधले होते. अनेक दवाखान्यात त्यांनी गरिबांन साठी मोफत भोजन शाळा सुरू केल्या होत्या. कात्रज परिसरातील झालेल्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते.
सध्या करोना रोगाने जगात हाहाकार माजवलेला असताना अश्या संसर्गजन्य आजाराच्या पाश्वभूमी वर सुरू असलेल्या लॉकडाऊन च्या काळात चाळीस दिवसात त्यांनी लाखो गरजू लोकांना 24 तास जेवण पुरविले. सातारा रस्त्यावरील पुष्पमंगल कार्यालय येथे ते स्वतः माणिकचंद भाऊंनी लक्ष ठेवून जेवण वाटत होते.स्वतः ते देखरेख ठेवत होते. त्यांच्या निधनाने अनेकांनी आमचे पितृतुल्य ,ऋषितुल्य मायेचे छत्र हरपले. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.भाऊंच्या अचानक जाण्याने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.आमचा आज श्रावण बाळ गेला. अशी भावना व्यक्त केली.
गरिबांसाठी त्यांनी आपल्या आई व पत्नी च्या नावाने दवाखाने व डायलसीस सेंटर समाजसेवा तत्वावर उभारले . त्यांच्या सामाजिक ,शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील विशेष कामाची दखल घेत अनेक गुणवंत ,व आदर्श पुरस्कार देण्यात आले.जैन समाजातील अनेक कामात त्यांनी पुढाकार घेत सामाजिक वास्तू उभारणीस प्रचंड मदत केली होती.
त्यांच्या मागे ४ मुले, पुतणे, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच पुणे शहर ,पिंपरी चिंचवड, ,तथा पुणे जिल्ह्यात, नगर, सोलापूर भागांत शोककळा पसरली.
पुण्यनगरीचे आदर्श समाजसेवक, प्रसिद्ध उद्योगपती,आदर्श गोपालक ,सेवेची निष्ठा,व कर्तव्य प्रामाणिक व्यक्ती अशी प्रसिद्ध ख्याती माणिकचंद,भाऊंची होती. यानिमित्ताने त्यांचे स्मरण करत आहोत."माणिकचंद शेठ "भाऊ" नावाचा हा वटवृक्ष आयुष्यभर इतरांना सावली देत राहिला. त्यांना सर्वजण प्रेमाने आदराने "भाऊ" या नावानं आदराने संबोधत .भाऊंचा जीवन परिचय करून देताना त्यांचे जीवन पैलू उलगडून वाचकांसमोर आणताना अंतकरण माझे जड होत आहे.काय लिहावे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीने.भाऊ हे तेजस्वी सूर्य होते. कारण उजेड देणारे पणतीची वात संपल्याने आज ती विझली आहे. त्यांनी केलेले कार्य ,त्यांनी रुजवलेली जीवन मूल्य सदैव समाजाला त्यांच्या कुटुंबाला प्रेरणा व आदर्श देत राहतील.सुर्यासमान तेजस्वी प्रकाश समाजाला त्यांनी दिला. स्वतः जळत राहून इतरांना सदैव प्रकाश,ऊर्जा देत राहिले.
अश्या थोर महात्म्यास,द्रष्ट्या ज्येष्ठ आधारवड समाजसेवकास "महाराष्ट्र वार्ताच्या" वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

---------------