(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
पोलीस खात्यामध्ये अहोरात्र कार्यरत असणारे राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे.पोलीस खात्यामधून वेळात वेळ काढून समाजाची अविरत सेवा करता- करता आपल्या शरीराची काळजी घेऊन व्यायाम करा,व फिट रहा असा संदेश पोलिसांना देत आहे.
कोरोनाबाबत महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस खडा पहारा देऊन राष्ट्रीय कर्तव्य व सेवा प्रामाणिक व सचोटीने करत आहेत. यामध्ये पोलिसांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे.याबाबत स्वकृतीतून दररोज भल्या पहाटे उठून योगा व सूर्यनमस्कार करून पोलीस व समाजासमोर आदर्श निर्माण करणारे राजगड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे.
महाराष्ट्र पोलीस दिवस रात्र कोरोना उपाययोजना व प्रतिबंधात्मक काम करताना दिसत आहे.त्यामध्ये राजगड पोलीस स्टेशन नसरापूर चे पोलीस अधिकारी व कर्मचारी डोळ्यात तेल घालून कोरोनाबाबत आपल्या सर्वांची काळजी घेऊन घरात रहा,व बाहेर पडू नका ,असे आवाहन वारंवार करत आहेत. मात्र यामध्ये हे सर्व करताना पोलीसांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, वाताहत होत आहे,जेवणाच्या अवेळी ,ताणतणाव यांमुळे स्वास्थ्य बिघडून जाते.ते बिघडून नये म्हणून "करो योग, रहो निरोग" असा संदेश व्यायामाच्या माध्यमातून दत्तात्रय दराडे यांनी दिला आहे.
कोरोना निर्मूलन व खबरदारी बाबत महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस खडा पहारा देत आहे. चेक पोस्ट नाक्यावर येणाऱ्या- जाणाऱ्यांची तपासणी करणे. सोशल मीडियावरून जनजागृती करणे.अत्यावश्यक बाबीकरिता प्रवास पास उपलब्ध करून देणे, प्रशासनाकडून आलेल्या मेसेज यांची अंमलबजावणी करून पोलीस बंदोबस्त लावणे. सातत्याने अनावश्यक फिरणाऱ्यावर कारवाई करणे.कायदा व सुव्यवस्था राखणे आदि बाबी पोलीस कोरोनाच्या काळात करत असताना दिसत आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका,व्यायाम करा आणि तंदुरुस्त रहा. असे विचार दत्तात्रय दराडे यांनी मांडला आहे.