आंबाडे नाकाबंदी चेकपोस्टला प्रांत राजेंद्रकुमार जाधव यांची अचानक भेट ....

Maharashtra varta

(आंबाडे नाका बंदी चेकपोस्टला प्रांत राजेंद्रकुमार जाधव यांनी भेट देऊन चेकपोस्ट बाबत आढावा घेताना)
_________________________________
कापूरहोळ( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

आंबाडे नाका बंदी चेकपोस्टला प्रांत राजेंद्रकुमार जाधव यांनी भेट देऊन चेकपोस्ट बाबत आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.
पुणे -सातारा जिल्हा सीमेवर भोर मांढरदेवी रोडवर आंबाडे येथे असलेल्या चेकपोस्टवर भिमराव शिंदे आणि मनोज पुरंदरे हे प्राथमिक शिक्षक गुरुवार दि.३०/४/२०२० रोजी दुपारी २ ते रात्री १० वा.अशी ड्युटी करीत असताना भोरचे प्रांत अधिकारी  राजेंद्रकुमार जाधव  यांनी  रात्री 8 वाजता भेट  दिली.

भोर तालुक्यातील सुमारे 650 हून अधिक प्राथमिक शिक्षक अहोरात्र कोरोना बाबत राष्ट्रीय काम करीत असताना दिसून येत आहे.
भोर तालुक्याचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे व गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम करत आहेत.

प्राथमिक शिक्षक तालुक्यातील गावागावातील रस्त्यांवर प्रशासनाने तयार केलेल्या नाका बंदी ठिकाणी दिवस-रात्र पहारा देत आहे. 
महाराष्ट्र वार्ताशी बोलताना भोरचे प्रांत राजेंद्र कुमार जाधव म्हणाले की, कोरोना बाबत भोर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अहोरात्र राष्ट्रीय कर्तव्य प्रामाणिक पद्धतीने करून प्रशासनास संपूर्णपणे सहकार्य करत आहे. प्राथमिक शिक्षक यांचे काम सुयोग्य व प्रामाणिक व गौरवास्पद  आहे.
To Top