( विंझर(ता.वेल्हे) :--येथील ज्ञानोबा भोसले यांच्या दुकानावरील उडालेली पत्रे).
__________________________________________
कापूरहोळ (प्रतिनिधी): विठ्ठल पवार.(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
वेल्हे तालुक्यातील विंझर, दापोडे, पाबे, हिरपोडी, वेल्हे बुद्रूक परिसरात गुरुवारी (दि.३०) वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने अनेक दुकानाचे पत्रे उडून आर्थिक नुकसान झाले आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या ज्वारी व कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे विंझर (ता.वेल्हे) येथील ज्ञानोबा भोसले यांच्या गाळ्यातील चारही दुकानाचे पत्रे उडून रस्त्यावर पडले असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
पाबे येथील विठ्ठल पवार यांच्या गॕरेजच्या दुकानावरील पत्रे उडून शेकडो रुपयांचे नुकसान झाले आहे. लाशिरगाव येथील शेतकरी प्रभाकर आधवडे यांच्या शेतातील ज्वारी पीक भुईसपाट झाले असून कांद्याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

यावेळी संपत आधवडे म्हणाले,"कोरोना व्हायरसमुळे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी या वादळी वाऱ्यामुळे पुन्हा संकटात सापडला आहे."