"जे एम. नेथर यांच्या" माध्यमातून भोर परिसरात गोरगरीब, 100 कुटुंबाना अन्नधान्य व आवश्यक वस्तू वितरण)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
पुणे ( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
"जे एम. नेथर ,उद्योजक (कांबरे खे. बा.) ता. भोर यांच्या माध्यमातून भोर तालुक्यातील परिसरात गोरगरीब, मजूर,वंचित व रेशनकार्ड नसलेले निराधार 100 कुटुंबातील एकूण 3200 लोकांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
कोरोनामुळे आलेले संकट यामध्ये आपल्या बांधवाना मदत व्हावी या हेतूने जे. एम .नेथर, उद्योजक कांबरे खे. बा. यांच्या माध्यमातून अन्न धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव मुळे देशात,राज्यात,पुणे जिल्हा मधील भोर तालुका परिसरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे व्यापार बंद असल्या कारणामुळे गोरगरिबांना जेवणाची प्रचंड गैरसोय होत होती,
गोरगरिबांची महत्वाची पोटा पाण्याची अडचण लक्षात घेऊन( दि.27 मार्च 2020) रोजी उद्योजक जे .एम नेथर यांच्या वतीने भोर परिसरामध्ये मध्ये 100 कुटुबांना धान्याचे किट वाटप करण्यात आले.
("महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना "उद्योजक जे .एम नेथर"म्हणाले की,आपण राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून देशावर आणि राज्यावर आकस्मित आलेल्या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी आपल्या मदतीची देशाला आणि राज्याला गरज असल्याने कोरोनाच संकट निवारणासाठी सढळ हाताने मदत करु या. आणि आपल्या देशबांधवांचे प्राण वाचवू या.देशासाठी आणि देशबांधवांसाठी.)
विठ्ठल पवार.
पत्रकार, पुणे.
मो. नं.९२२६८००७८३