"भोर भाजपचे धरणे आंदोलन"

Maharashtra varta
(महा विकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन करताना भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते)
----------------------------------------
पुणे(प्रतिनिधी):---
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था या मुद्द्यांवरून भोर तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी( दि.25 )रोजी घोषणाबाजी करत भोर तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. 

 भोर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात भोर येथील तहसील कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे व शहराध्यक्ष सचिन मांडके यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.भोर  एसटी स्टँड वरून घोषणा देत आंदोलनकर्ते राजवाडा चौकात आले. आणि राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार मृदुला मोरे यांना निवेदन देण्यात आले. भोर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

 यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणिस बाळासाहेब गरुड, गणेश निगडे,  कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे,  शहाराध्यक्ष सचिन मांडके, भोरचे युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे, भोरच्या मा. नगराध्यक्षा दिपाली शेटे, विश्वास ननावरे, प्रदिप खोपडे, डॉ नागेंद्र चौबे,संतोष धावले, अॅड. कपिल दुसंगे, सुधीर शेडगे, डॉ. श्याम दलाल, अशोक पांगारे, विजयकुमार वाकडे,  स्वाती गांधी, अंबडकर लता, शालिनी सागळे, मनिषा राजीवडे, संतोष लोहकरे, मनोहर जोशी, संजय खरमरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 (भोर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने ,राज्य सरकारच्या विरोधात  निवासी नायब तहसीलदार मृदुला मोरे यांना निवेदन देताना )
---------------------------------------



To Top