संगणक शिक्षण ही काळाची गरज ", भोर पंचायत समितीचे सदस्य,रोहनदादा बाठे .

Maharashtra varta

भोर (प्रतिनिधी)विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाइन)
"विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोलाची भर पडेल,स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थीही आधुनिक अध्यापनाने गरुड झेप घेतील, टी.व्ही. पाहू नका असे म्हणणारे पालकही शाळेतील अभ्यासक्रम  आता टीव्हीवर पहा,असे म्हणतील,त्यातूनच मुलांच्या ज्ञानकक्षा नक्कीच शिक्षकांच्या प्रयत्नाने उंचावतील, आणि शिक्षण प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे. त्यामुळे  शिक्षणप्रक्रिया आनंददायी होईल व संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे",असे प्रतिपादन भोर पंचायत समितीचे सदस्य, रोहनदादा बाठे यांनी केले. 

 हरिश्चंद्री  ता. भोर,येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हरिश्चंद्री या प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 24/12/2019 वार मंगळवार रोजी ई-लर्निंग संचाचे पंचायत समिती सदस्य रोहनदादा बाठे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ इंडिया शाखा, शिवाजीनगर यांच्या वतीने जि. प. प्राथ. शाळा, हरिश्चंद्री यांना  एक दूरचित्रवाणी संच, इ. पहिली ते इ.चौथी अभ्यासक्रम सॉफ्टवेअर देण्यात आले. त्यासाठी श्री. रोहनदादा बाठे यांनी मोलाचे  सहकार्य केले. 
कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे आदर्श तंत्रस्नेही मुख्याध्यापक कमलाकर मोहिते यांनी प्रास्ताविक केले. या दूरचित्रवाणी संचाचा व अभ्यासक्रमांचा मुलांना कसा फायदा होईल? हे त्यांनी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ इंडिया शाखा, शिवाजीनगर येथील श्री. संघवी सरांनी  हे किट शाळेला दिल्याबद्दल विशेष आभार  व्यक्त करण्यात आले.शाळेतील सहशिक्षक श्री. अतुल मोरे सर यांनी या यंत्रणेचा उपस्थितांना डेमो दाखवला. शाळेतील मुलांना खूप आनंद झाला आहे असे उदगार उपस्थितांनी काढले. यावेळी ग्रामपंचायतीने शाळेला आलेले संपूर्ण लाईट बिल चेक द्वारे भरल्याचे सरपंच सौ. संध्याताई गाडे  यांनी सांगितले

यावेळी सरपंच सौ संध्याताई गाडे,उपसरपंच श्री दत्तात्रय बाठे ,सदस्या सौ. वर्षाताई गाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गणेश बबन गाडे, अंगणवाडी सेविका सौ. स्वाती पाचकाळे ,मदतनीस सौ. सविता चाळेकर यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंगणवाडी ताई सौ. स्वातीताई पाचकाळे यांनी सर्वांचे आभार मानले.
To Top