कापूरहोळ( प्रतिनिधी):-
राजगड पोलीस स्टेशन हे नॅशनल हायवे लगत असुन सदर ठिकाणी हे रहदारीचे आहे. पोलीस स्टेशन हददीत कंपन्या/पर्यटन स्थळे/थार्मिक स्थळे असुन लोकांचे रहदाराचे प्रमाणे अधिक आहे. त्याचप्रमाणे अर्जदार नामे रंजना रविद्र पाटील रा. शिगाव ता. वाळवा जि. सांगली मो.नं. ९८६०८५७९४० यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे दिनांक २७/०७/२०२५ रोजी सकाळी ०८.०० वा सुमारास येवुन कळविले की, मी दिनांक २६/०४/२०२५ रोजी रात्री १०.०० वाजता शिगाव ता. वाळवा जि. सांगली-सांगोला पुणे असा कारने प्रवास करत असताना रात्री नक्की वेळ माहित नाही आमचे कारचे डिक्कीतील पर्स ही प्रवासारदरम्यान कोठेतरी पडुन गहाळ झाली आहे. आम्ही राजगड हॉटेल केळवडे ता. भोर जि. पुणे येथे असताना आमचे लक्षात आले की कार चे डिक्कीमध्ये पर्स नाही. तरी बॅगेमध्ये ५ तोळयाचे सोन्याचे मंगळसुत्र, १ सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन व रोख रक्कम रु ३,००० रू आहेत. सदर घटनेच्या दिवशी ठाणे अंमलदार असणारे पो. हवा/२३२० मदने व डे पोलीस अंमलदार म.पो.शि. मांगले यांनी लागलीच पोलीस स्टेशन येथे गहाळ नोंद घेवून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन लागलीच सदर बाब पोलीस निरीक्षक राजेश गवळी राजगड पोलीस स्टेशन यांना कळवुन गहाळ मालमत्तेच काम पाहणारे पो. शि./२९२० नलावडे यांना कळविली असता तांत्रिक तपासाद्वारे असे समजले की, सदरची बॅगेतील मोबाईल चे लोकेशन हे सांगोला येथे आहे. लागलीच ऑम्ही मोबाईल च्या लोकेशनवर गोपनीय बातमीदार यांस लागलीच पाठवुन बॅगीतील मोबाईल बाबत काही एक माहिती मिळत आहे का हे पाहण्यासाठी पाठविले असतान सदर लोकशन वर गोपनीय बातमीदारास एक पांढ-या हिव्या रंगाची पर्स त्यामध्ये १ सॅमसंग कंपनीचा मोबाईल ५ तोळे सोन्याचे गंठण व रोख रक्कम ३,००० रू मिळून आले. लागलीच आम्ही सदर बॅग व बॅगेतील व्हिडीओ काढुन अर्जदार यांना दाखविली असता त्यांनी बॅग व बॅगेतील सोने मोबाईल ओळखुन बॅग माझीच असल्याचे अर्जदार यांनी सांगितले.
त्यानुसार राजगड पोलीस स्टेशन गडील गहाळ रजिस्टर नंबर २२५/२०२५ मधील अंदाजे ५,५०,०००/- हजार रू चे ५ तोळयाचे सोन्याचे मंगळसुत्र व २५,००० रू किंमतीचा सॅमसंगग कंपनीचा मोबाईल तसेच रोख रक्कम ३,००० रू मिळुन आल्याने गहाळ झालेली मालमत्ता तक्रारदार यांच्या ताब्यात दिली आहे. सदर कामगीरीमुळे अर्जदार यांनी आनंद व्यक्त करून पोलीसांना पेढे भरवुन पोलीसांचे आभार मानले आहेत.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक सो, संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड तानाजी बरडे, राजगड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजेश गवळी याचे मार्गदर्शनाखली राजगड पोलीस स्टेशन सहा. पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलीस उपिनिरीक्षक अजित पाटील, महिला पोलीस अंमलदार पुनम मांगले पोलीस अंमलदार नाना मदने, मयुर निंबाळकर, अक्षय नलावडे, मंगेश कुभांर, अजय चांदा यांनी केलेली आहे.