रस्त्यावरील अवैध खडी वाहतूक थांबवण्यासाठी युवा शेतकरी संघाचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे लेखी आवाज!

Maharashtra varta




पुणे (प्रतिनिधी):-

कुसगांव (ता. भोर) ते निगडे बु।।, बोरावळे (ता. राजगड) या रस्त्यावर सुरू असलेल्या अनधिकृत डंपर व हायवा वाहतुकीचा चुकीच्या पद्धतीने व अवैध पद्धतीने सुरू असल्याचे लेखी  तक्रार निवेदन युवा शेतकरी संघाचे अध्यक्ष रोहिदास बापू चोरघे यांनी नुकतेच दिले आहे . 

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुसगांव ते निगडे बु।। बोरावळे या रस्त्यावर अनधिकृत डंपर व हायवा गाड्यांतून खडी व क्रशरची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. यामुळे घाटातील सिंगल वळणावळणाच्या रस्त्याचे मोठे नुकसान होत असून अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. याच मार्गावरून विद्यार्थी, कामगार वर्ग व स्थानिक नागरिक यांची नियमित वर्दळ असते.या गंभीर समस्येवर त्वरित लक्ष वेधण्यासाठी युवा शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास बापू चोरघे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणेचे अर्चना गायकवाड यांना लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात डंपर व हायवा गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक ३५ ते ४५ टनापर्यंत खडी भरली जात असून, वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या प्रकरणात तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा युवा शेतकरी संघाच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनाप्रसंगी सोपान भाऊ चोरघे, शरद पिलाने, सागर मोझर, भगवान खुटवड, राकेश खोपडे, चंद्रकांत मोरे, दत्ता वीर, संतोष खुटवड व शोभराज चोरघे, ही मंडळीही उपस्थित होती.

To Top