भोर तालुक्यात ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम

Maharashtra varta

भोर तालुक्यात ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम 




नसरापूर( प्रतिनिधी):-●विठ्ठल पवार सर●

देशातील निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे घेतल्या जातात. या ईव्हीएम मशीन संदर्भात संभ्रम निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली  असल्याचे प्रतिपादन भोरचे प्रांत विकास खरात  व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले.


भोर तालुक्यातील विविध गावात याबाबत जनजागृती सुरू असताना देगाव,करंदी खे .बा .कांबरे खे. बा.या गावात तलाठी प्रवीण गरुड यांनी  ईव्हीएम मशीन जनजागृती कार्यक्रम गावातील नागरीक महिला,व पदाधिकारी यांचे उपस्थितीत पार पडला. 


भोर  विधानसभा क्षेत्रात भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या मार्गदर्शनामध्ये ईव्हीएम जनजागृती मोहीम सुरू झाली आहे. प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम मशीन बाबत असणारे गैरसमज संभ्रम दूर करून ईव्हीएम मशीन हे सुयोग्य रीतीने व अचूक रीतीने काम करीत असल्याचे दाखवण्यात  आले.


2024  हे निवडणुकीच वर्ष म्हणून गणल जात आहे. यावर्षी लोकसभा विधानसभा निवडणुका संपूर्ण देशात पार पडल्या. या अनुषंगाने  विधानसभा निवडणूकीचे आयोगाने तयारी सुरु  केली आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यातंर्गत तालुक्यात जनजागृती मोहिम सुरु झाली असून ईव्हीएम जनजागृती मोहीम पथकाने ग्रामपंचायत  कार्यालयात गावच्या दर्शनी भागात प्रात्याक्षिक करुन दाखविले. विशेष म्हणजे, विधानसभा क्षेत्रात तहसील कार्यालयात एक युनिट एक फिरते पथक तर भोर तालुक्यात  फिरते पथक तयार करण्यात आले आहेत. हे पथक शासकीय कार्यालय, शाळा, ग्रामपंचायत, सार्वजनिक ठिकाणी ईव्हीएम व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिट यांची ओळख मतदारांना करून देत आहे.

तर मतदार प्रत्यक्ष मतदान करून प्रक्रिया समजून घेत आहेत. निवडणूक काळात मतदार ईव्हीएम संदर्भात जागरूक होण्यासाठी या मोहिमेचा लाभ मतदारांनी घेण्याची आवाहन तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले आहे. 




To Top