कालच्या आक्रोश मोर्च्यात यांनी शाळा सुरू ठेवल्या, योग्य की अयोग्य
पुणे (प्रतिनिधी):-●संपादक स्पेशल रिपोर्ट●
वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात राज्यातील तब्बल १९ शिक्षक संघटनांनी सामूहिक रजा आंदोलन करीत शाळा बंद ठेवल्या. मात्र, यात पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी, सणसवाडी (ता. शिरूर) या दोन शाळांमधील शिक्षकांनी प्राधान्य देत या आंदोलनावरच बहिष्कार टाकीत विद्यार्थिहितालाच प्राधान्य दिले. तसेच पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हे पाहण्यास मिळाले.
दिलीपराव देशमुख म्हणाले की, असल्या अति उत्साही व मानासाठी हपापलेल्या लोकांमुळेच इतर सर्व शिक्षकांना ज्यादा तास, नको ते उपक्रम आणि इतर अतिरिक्त कामांची सक्ती अधिकारी करतात. ते म्हणतात ही लोकं करतात तर तुम्ही का करु शकत नाही. माझे असे विचार आहेत की आपण सर्वजण शाळेच्या वेळेत अतिशय प्रामाणिक पणे काम करतो. मग अतिरिक्त काम आपण का करावे.Overtime ची पद्धत आपल्या प्रशासनामध्ये कुठेही नाही. मग आपल्या कुटुंबाचा किंवा आपला वैयक्तिक वेळ का खर्च करावा. ज्यांना आहे इच्छा त्यांनी जरुर अतिरिक्त वेळ द्यावा पण मग त्याचा प्रचार प्रसार करु नये तो त्यांच्या पुरताच मर्यादित ठेवावा. त्याच्या प्रचार प्रसाराचा अधिकारी गैरफायदा घेतात आणि इतर शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा दबाव टाकतात. त्याचा त्रास मग सर्वांना होतो. त्यामुळे माझे असे मत आहे की, आपल्याला ओव्हरटाईम कामाचा भत्ता मिळत नाही तर आपण ओव्हरटाईम काम करु नये. तरीही आपण शाळेची अनेक कामे घरी करतच असतो. तर आता इथून पुढे तरी अशा अतिरिक्त, अशैक्षणिक, शाळाबाह्य कामांना सर्वांनी तीव्र विरोध केला पाहिजे. अगदी शिष्यवृत्तीचे ज्यादा तास घेण्याची सुद्धा गरज नाही. नवीन शैक्षणिक धोरणात मुलांना अतिरिक्त ताण देऊ नये असे स्पष्ट आहे. शिष्यवृत्ती परीक्षा हा नियमित शिक्षणाचा भाग नाही तरी पण आपली जिल्हा परिषद 100 टक्के मुलांना बसवण्याची सक्ती करते आणि मग 5 वी 8 वी च्या शिक्षकांना त्रास देते.हा पण अन्याय आहे. त्या विरुद्ध पण आवाज उठवला पाहिजे सर्वांनी.