आमदार संग्राम थोपटे यांच्यामुळे भाटघर व वीर धरणग्रस्त गावांना मिळाली नवी जीवनरेखा :-महेश टापरे.
भोर (प्रतिनिधी):-
भाटघर व वीर धरणग्रस्त बाधित झालेल्या गावांना विविध नागरी सुविधा पुरविणे यासाठी प्रदीर्घ काळापासून आमदार संग्राम थोपटे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून त्या गावांतील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी ,बस थांबे, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक स्वच्छतागृह ,अशा नागरी सुविधा कामांसाठी प्रशासकीय मंजुरी आणली असून या मंजूर झालेल्या दोन्ही धरणग्रस्त गावातील विकासकामे लवकरच होणार असून या कामांचे श्रेय उगाच कोणीही घेऊ नये ही विकास कामे फक्त आणि फक्त आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाली आहेत,आमदार संग्राम थोपटे यांच्यामुळे भाटघर व वीर धरणग्रस्त गावांना नवी जीवनरेखा मिळाली आहे .भोर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वीर धरणग्रस्त सचिव तथा पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे यांनी सांगितले.
भाटघर तसेच वीर धरणग्रस्त नागरी सुविधा कामांना मंजुरी मिळविण्याकरिता दोन्ही प्रकल्पग्रस्त समितीत्यांनी सुरुवातीच्या काळापासून ग्रामपंचायतींचे ठराव , प्रस्ताव घेणे, गावात अंतर्गत पाहणी करून विकास कामांची आखणी करणे, संबंधित विभागाला वेळोवेळी कागदपत्रके देणे ,त्यांचा पाठपुरावा करणे, आमदार थोपटें यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेणे ,अधिका-यांना गावातील कामांचा आराखडा देणे अशी सर्वच कामे आमदार थोपटे यांच्याकडून पाठपुरावा करत मंजूर झालेली आहेत असेही दोन्ही प्रकल्पग्रस्त समितीतील पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
रायरेश्वर विकास डोंगरी परिषदेचे मानद सचिव बाळासाहेब थोपटे,तालुका कॉंग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे, भाटघर धरणग्रस्त प्रकल्प समिती अध्यक्ष विठ्ठल वरखडे, वीर प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष रोहन बाठे, सचिव महेश टापरे,काळूराम मळेकर, माऊली दानवले, अनिल डोंबे, माजी नगरसेवक चंद्रकांत मळेकर,बारे खुर्दच्या सरपंच सुनिता गायकवाड व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
- (भाटघर व वीर धरणग्रस्त प्रकल्पांतर्गत प्रशासकीय मिळालेल्या मंजूर कामाचे श्रेय उगाच कोणीही घेऊ नये - शैलेश सोनवणे)