भोर तालुक्यात शिक्षकांचे अभिनव आंदोलन

Maharashtra varta

भोर तालुक्यात शिक्षकांचे अभिनव आंदोलन●



भोर (प्रतिनिधी)

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा भोर च्या वतीने भोर तहसील कार्यालयासमोर धरणे व निदर्शन करण्यात आले. पुणे जिल्हा शिक्षक समितीचे सरचिटणीस संदीप आप्पा जगताप, शिक्षक नेते श्री संजय पवार, अध्यक्ष श्री महेंद्र शिंदे, सरचिटणीस श्री. सुरेश खोपडे, कार्याध्यक्ष श्री रवींद्रनाथ थोपटे, कोषाध्यक्ष श्री. राजेंद्र वाडकर, संपर्क प्रमुख श्री. शरद पवार, प्रवक्ते श्री शशिकांत भागवत,सहचिटनीस श्री. विनायक भंडारी महिला आघाडी प्रमुख सौं राजश्री रायकर, सौं शुभांगी खोपडे आदी शिक्षक बंधुभगिनी उपस्थित होते.

श्री महेंद्र शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक नेते श्री सुरेश कदम यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.त्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.त्यावेळी 1)शिक्षक संच मान्यता पूर्वीप्रमाणे ठेवावी 

2)ड्रेसकोड सक्ती करू नये.

3)ऑनलाईन कामे कमी करावीत 

4)विनंती बदल्या कराव्यात 

5)अशैक्षणिक कामातून मुक्तता करावी.

अशा मागण्या करण्यात आल्या.

श्रीम. मधुमती पाटील अव्वल कारकून यांनी तहसील कार्यालयाच्या वतीने निवेदन स्वीकारले.

To Top