महामानवांची पुतळ्यांचे सुशोभिकरण करा:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी मागणी.
भोर (प्रतिनिधी)
भोर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भोर नगरपालिकेत भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याबरोबर भोर एसटी स्टँड जवळील महामानवांची पुतळे आहे.या पुतळ्यांना सुशोभिकरण करण्यात यावे ,तसेच पुतळ्यांच्या देखभालीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. याची नोंद घ्यावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन सेना भोर, वेल्हा, मुळशी विधानसभा अध्यक्ष किशोर भाऊ अमोलिक, दादासाहेब शेलार (आर.पी. आय.कामगार आघाडी प.महाराष्ट्र सरचिटणीस),रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष सतीश आडसुळ, भीम आर्मी चे विधानसभा अध्यक्ष महेंद्र साळुंखे, वंचित बहुजन आघाडी विनोद भालेराव ,भारतीय बौद्ध महासभा रामभाऊ रणखांबे ,दादासाहेब शेलार, राजन घोडेस्वार ,रविंद्र कांबळे आदि आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते.
