मोरवाडी वागजवाडी येथील वाघजाई माता मंदिर ठिकाणी रोहन बाठे यांनी बसवले पथदिवे.
नसरापूर (प्रतिनिधी)
भोर तालुक्यातील वागजवाडी मोरवाडी येथील जागृत देवस्थान वाघजाई माता मंदिरा ठिकाणी भोर पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांच्या माध्यमातून व भोर ,वेल्हे, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली पथदिवे नुकतेच बसवण्यात आले आहे.
वाघजवाडी व मोरवाडी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जागृत देवस्थान वाघजाई माता मंदिर आहे.येथे लाईटची सोय नसल्यामुळे भाविकांची प्रचंड गैरसोय होत होती. रात्री चे दर्शनास जाणे भाविकांना अडचणीचे होत होते. त्यामुळे येथे पथदिवे बसवल्याने भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाघजवाडी व मोरवाडी येथील नागरिकांची मंदिरालगत पथदिवे बसवण्याची मागणी लक्षात घेऊन भोर पंचायत समितीचे सदस्य रोहन बाठे यांनी सौर पथदिवे बसवून ही गैरसोय दूर करण्यात आली आहे.पथदिवे बसवण्यासाठी ग्रामस्थांच्या बरोबर 6 ते 7 किलोमीटर पायी प्रवास करत मंदिरा पर्यंत पोहचले व पथदिवे बसवले.
या प्रसंगी सरपंच संगीता मोरे , संतोष मोरे, किरण मोरे, मारुती मोरे, मच्छिंद्र मोरे, राजु मोरे, नाना मोरे, अमोल मोरे उपस्थित होते.