विजय वाघमारे व ग.वा.सोनवणे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार .
नसरापूर (प्रतिनिधी) :
शिक्षकी पेशातला माणूस हा समाजातला आदर्श नागरिक असतो. समाजाची शिक्षकांप्रति कार्याची वेगळी मोजपट्टी आहे. शिक्षकीपेशा सर्व क्षेत्रात पवित्र मानला जातो, मात्र त्याचे पावित्र्य जोपासण्यासाठीची जबाबदारी शिक्षकांची आहे. सेवानिवृत्तीनंतर वेळ मिळेल, तेव्हा लिखाण व मार्गदर्शन करण्याचे आवाहन भोर तालुका शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते मामा तनपुरे यांनी केले.
नसरापूर केंद्रातील केळवडे शाळेचे मुख्याध्यापक विजय वाघमारे तसेच जांभळी केंद्रातील पारवडी शाळेचे मुख्याध्यापक ग.वा.सोनवणे हे दोघेही सेवानिवृत्त झाल्याने भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तथा , मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या माध्यमातून या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.
त्यावेळी अध्यक्षीय भाषणा प्रसंगी शिक्षक नेते मामा तनपुरे बोलत होते.विजय वाघमारे व ग. वा. सोनवणे यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
गेली दोन ते तीन दशकाहून अधिक काळ भोर ,वेल्हे हवेली,तालुक्यात शिक्षण क्षेत्रात शिक्षक ,पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, म्हणून वाघमारे व सोनवणे यांनी उत्कृष्ट कामकाज केले.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यात व व समाज विकास साधण्याचं प्रभावी काम त्यांनी केले आहे.
यावेळी शिक्षक नेते आ. कु. बांदल, ,कार्याध्यक्ष विकास खुटवड, अनिल गायकवाड, आदी व इतर मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

