फसवणूक प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल.

Maharashtra varta

 फसवणूक प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल.





नसरापूर( प्रतिनिधी)

खडकी ता. भोर येथील शेतकरी असलेले सुदाम नागू रांजणे यांची लाखो रुपयांची फसवणूक  प्रकरणी अभिजीत अविनाश मुळे (रा. मलवडी, ता. माण, जि. सातारा) व सदाशिव यशवंत मांडवे यांच्यावर राजगड पोलीस स्टेशन नसरापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळे व मांडवे हे दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

राजगड पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारा मुळे याने  शेतकरी सुदाम रांजणे यांच्याशी ओळख वाढवुन भागीदारीत प्रिंटींग व्यवसाय करण्याचा बहाणा करुन रांजणे यांच्याकडून वेळो वेळी  5 लाख 46 हजार रुपये घेऊन पोबारा केला. राजगड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदाम नागू रांजणे (वय 52 रा. खडकी ता. भोर) या शेतकऱ्याने ही फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, त्यानुसार अभिजीत अविनाश मुळे (रा. मलवडी, ता. माण, जि. सातारा) व सदाशिव यशवंत मांडवे (रा. सातारा जि. सातारा) या दोघांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदिप घोरपडे यांनी याबाबत माहीती देताना सांगितले की, तक्रारदार सुदाम रांजणे व अभिजीत मुळे यांची ओळख झाल्यावर मुळे याने माझा बँग प्रिंटिंगचा व्यवसाय असून तो चांगला चालला आहे. असे सांगितले व रांजणे यांचा विश्वास संपादन करुन माझा  व्यवसाय आधुनिक करायचा असून त्यासाठी पैशांची गरज आहे. तुम्ही या मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला फायदा मिळवून देतो असे सांगून दोघांनी मिळून स्वामी समर्थ बँग प्रिंटीग नावाने भागीदारीत व्यवसाय करायचे ठरवून तसे भागीदारी पत्र नोटरी करुन घेतले होते. दरम्यान काळात मुळे याने रांजणे यांना आपल्याला शिलाई मशिन व प्रिंटीग मशिन खरेदी करायचे आहे ,त्यासाठी सदाशिव यशवंत मांडवे याला एक लाख रुपये पाठवण्यास सांगितले ते रांजणे यांनी पाठवले. त्या नंतर दुकानचे भाडे व मशिनरी खरेदी साठी दीड लाख रुपये, नंतर पुन्हा शिलाई मशिनसाठी 50 हजार असे पैसे घेतले तसेच वेळो वेळी 2 लाख 46 हजार रुपये रोख असे मिळून 5 लाख 46 हजार रुपये एन एफ टी व रोख स्वरूपात मुळे व मांडवे यांनी घेतले, परंतू नंतर व्यवसायाबाबत रांजणे यांना काहीच माहीती देत नव्हते व बोलण्याचे टाळत होते. यावर रांजणे यांना शंका आल्यावर त्यांनी मुळे यांच्या बाबत चौकशी केली असता, मुळे याने कोणताही व्यवसाय सुरु केला नसून आपली फसवणुक करत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मुळे व मांडवे यांच्या विरोधात राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



आरोपी अभिजीत मुळे व सदाशिव मांडवे हे दोघे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रमोद भोसले पुढील तपास करत आहेत. सदर आरोपी अभिजीत मुळे याने अजून कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे अवाहन पोलिस निरीक्षक संदिप घोरपडे यांनी केले आहे.


(नसरापूर ता. भोर येथे काही महिन्यांपूर्वी अभिजीत मुळे याने बॅग तथा पिशव्या निर्मितीचा  व्यवसाय सुरू केला होता. बाजारातील लोकांना त्याने जास्तीत जास्त पैसे कमावून लखपती करून देतो,त्यासाठी या व्यवसायात भागीदार व्हा,किंवा माझ्याकडे पैसे द्या, असे सांगितले होते,त्यानुसार त्याने लाखो रुपये नागरिकांकडून  गोळा केले होते.  नसरापूर येथील त्याच्या या  दुकानात कामाला असलेल्या कामगारांचा पगार देखील दिला नसल्याचे समोर येते आहे,पगार न दिल्याने  महिला यांची उपासमार झाली आहे,.फसवणूक करणाऱ्या मुळे याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.)



To Top