खेडशिवापुर (प्रतिनिधी)
कोकणातील गणेश भक्तांसाठी कोकणात जाण्यासाठी व कोकणातून राहण्याच्या ठिकाणी परतण्यासाठी खेड शिवापूर टोल नाका व्यवस्थापन यांच्या वतीने टोल नाक्यावर दोन लेन स्वतंत्र ठेवण्यात आलेल्या असून "कोकण गणेश भक्त" असा पास घेतलेल्या कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या गणेश भक्तांना टोल फ्री आहे.व हायवेवर टोल प्लाझा व वरवे फाटा, नसरापूर व धांगवडी येथे एक्स्ट्रा ट्रॅफिक मार्शल यांची नियुक्ती करण्यात आली असून टोल केंद्रावर दोन्ही बाजूला फिरते सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती खेड शिवापूर टोल प्रशासनाचे महाव्यवस्थापक अमित बाठिया यांनी दिली.
खेडशिवापुर टोल प्रशासनाने वरवे फाटा, नसरापूर व धांगवडी येथे एक्स्ट्रा ट्रॅफिक मार्शल नियुक्ती केल्यामुळे वाहतुक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. हायवेवर ठिकठिकाणी गणेश भक्तांचे स्वागताचे फ्लेक्स खेड शिवापूर टोल नाक्याने लावले आहेत.यावेळेस पुणे सातारा टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापक बी. जे .शर्मा व श्रीनिवास राव उपस्थित होते.
बातम्यांसाठी संपर्क:-
टी. एस .यादव.
मो. नं.९८६०५७६१६५.
पत्रकार.
_____________________________________