जुनी पेन्शन च्या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलनास पाठिंबा.

Maharashtra varta

 जुनी पेन्शन च्या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलनास पाठिंबा



पुणे  (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार सर .

१ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत आलेले सर्व शासकीय, निम-शासकीय, अनुदानित संस्थातील कर्मचारी, शिक्षकांना १९८२ ची जुनी पेन्शन आणि १९८४ ची भविष्य निर्वाह निधी योजना लागू होणे हा आपला हक्क आहे. ३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन निर्णयाने बंद झालेली जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यासाठीचा अविरत संघर्ष न्यायसंगत आहे अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ची ठाम भूमिका आहे.

त्यामुळेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर दि. २ ऑक्टोबर २०२४ पासून वर्धा येथे  सुरू असलेले महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने आयोजित केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चा पाठिंबा जाहीर करण्यात असल्याची माहिती विजय कोंबे राज्याध्यक्ष व  राजन कोरगावकर राज्य सरचिटणीस महाराष्ट्र शिक्षक समिती यांनी दिली आहे.याबाबतचे  पाठिंबा पत्र महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे वितेशजी खांडेकर (राज्याध्यक्ष) व  गोविंदजी उगले (राज्य सरचिटणीस)  यांना देण्यात आले आहे.



To Top